Home > Politics > निवडणूक आयोगाच्या निकालप्रकरणी ठाकरे गट विरुध्द शिंदे गट आमने-सामने

निवडणूक आयोगाच्या निकालप्रकरणी ठाकरे गट विरुध्द शिंदे गट आमने-सामने

निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालप्रकरणी ठाकरे गट विरुध्द शिंदे गट आमने-सामने
X

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हाती दिले आहे. त्याविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरून पुन्हा शिंदे गट विरुध्द ठाकरे गट आमने-सामने आले आहेत.

त्यातच ठाकरे गट निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज मेन्शन करून आव्हान देणार आहे. त्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील प्रकरणावर पाच सदस्यांच्या घटनापीठाने सुनावणी करावी, अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र या मागणीला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून विरोध केला जात आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हे वेगळे प्रकरण आहे. त्यामुळे हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे देण्याची गरज नसल्याचे म्हणणे शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण मेन्शन करून घेणार का? हे सुध्दा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 21 Feb 2023 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top