Home > Politics > अखेर संजय राऊत यांचा सूर नरमला

अखेर संजय राऊत यांचा सूर नरमला

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

अखेर संजय राऊत यांचा सूर नरमला
X

गेल्या काही दिवसांच्या सत्तानाट्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने पुर्णविराम मिळाला. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. तर या ट्वीटमध्ये शेवटी काळजी करू नका म्हणलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

संजय राऊत यांना 27 जून रोजी ईडीने समन्स पाठवले होते. मात्र त्या काळात राज्यात सत्तानाट्य जोरदार रंगले होते. तर संजय राऊत हे शिवसेनेच्या अलिबाग येथील मेळाव्यासाठी जाणार होते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या चौकशीला जाणे टाळले होते. मात्र त्यानंतर आता संजय राऊत यांनी ट्वीट करून आपण दुपारी 12 वा ED च्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, मी आज दुपारी 12 वा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहे. ईडीने पाठवलेल्या समन्सचा सन्मान करत चौकशीला सहकार्य करण्यासाठी जाणार आहे. तर चौकशीला सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी शिवसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी ED च्या कार्यालयात जमू नये. काळजी करू नका, असं संजय राऊत म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये 1 हजार 39 कोटी 79 लाख रुपयांचे मनी लाँडरींग केल्याचा आरोप करत 2018 मध्ये संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि गुरू आशिष कन्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रविण राऊत, राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरोधात म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार दिली होती. या प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात राकेश वाधवान यांच्या एचडीआयएल कंपनीने 100 कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या खात्यात वळवल्याचे ईडीच्या चौकशीत दिसून आले. तर प्रवीण राऊत यांनी हा पैसा मित्र, कुटूंब आणि नातेवाईकांच्या खात्यात पाठवल्याचे ईडीने म्हटले आहे. तर या पैशातील 83 लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी आणि संजय राऊत यांची पत्नी यांच्या खात्यात पाठवल्याचे ईडीने म्हटले. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यापुर्वीही संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर फुलवाल्याचे आणि केटरिंगवाल्याची चौकशी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी ईडीने नोटीस पाठवली होती. तर 27 जून रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवले होते. मात्र संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. मात्र आता संजय राऊत चौकशीसाठी जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा सूर नरमल्याची चर्चा आहे.

Updated : 1 July 2022 4:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top