Home > Politics > आपल्यासोबत 40 आमदार, गुवाहाटीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांचा दावा

आपल्यासोबत 40 आमदार, गुवाहाटीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांचा दावा

आपल्यासोबत 40 आमदार, गुवाहाटीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांचा दावा
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत जास्त आमदार नसल्याचा दावा शिवसेना आणि इतर नेते करत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदें यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना सुरतमधून विमानामार्गे गुवाहाटीला नेण्यात आले आहे. गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार आहेत, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आपल्याला पुढे न्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान मंगळवारी रात्री सुमारे २.१५ वाजाता एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना सूरतमधील हॉटेलमधून विमानतळावर नेण्यात आले. बंडखोर आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बसेस विमानतळावर पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना "जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचा 'गर्व से कहो हम हिंदू हैं' हा नारा सार्थ केला जाईल, फिर मिलेंगे अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. एवढेच नाही तर "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही सोडली नाही आणि सोडणारही नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सुरत विमानतळावर पत्रकारांना सांगितले.

एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापनेसाठी समर्थक आमदारांनी सह्या केल्याचेही सांगितले जात आहे. त्यासाठी ३७ आमदारांची गरज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा ३७ आमदारांचा कोटा पूर्ण झाल्याचाही दावा केला जातो आहे. एकनाश शिंदे यांच्यासोबत मंत्री बच्चू कडू हे देखील आहेत. तसेच यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव ह्या देखील शिंदेंसोबत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार

1 महेंद्र थोरवे

2 भरत गोगावले

3 महेंद्र दळवी

4 अनिल बाबर

5 महेश शिंदे

6 शहाजी पाटील

7 शंभूराज देसाई

8 बालाजी कल्याणकर

9 ज्ञानराजे चौघुले

10 रमेश बोरणारे

11 तानाजी सावंत

12 संदिपान भुमरे

13 अब्दुल सत्तार

14 नितीन देशमुख

15 प्रकाश सुर्वे

16 किशोर पाटील

17 सुहास कांदे

18 संजय शिरसाट

19 प्रदीप जयस्वाल

20 संजय रायुलकर

21 संजय गायकवाड

22 एकनाथ शिंदे

23 विश्वनाथ भोईर

24 राजकुमार पटेल

25 शांताराम मोरे

26 श्रीनिवास वनगा

27 प्रताप सरनाईक

28 प्रकाश अबिटकर

29 चिमणराव पाटील

30 नरेंद्र बोंडेकर

31 लता सोनावणे

32 यामिनी जाधव

33 बालाजी किनीकर

Updated : 22 Jun 2022 6:55 AM IST
Next Story
Share it
Top