Home > Politics > Eknath Shinde भाजपमध्ये जाणार म्हणणाऱ्यांना दिपाली सय्यद यांचा टोला

Eknath Shinde भाजपमध्ये जाणार म्हणणाऱ्यांना दिपाली सय्यद यांचा टोला

Eknath Shinde भाजपमध्ये जाणार म्हणणाऱ्यांना दिपाली सय्यद यांचा टोला
X

शिवसेनेचे (Shivsena) वजनदार मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी पक्षातील नाराजीमुळे बंड केल्याच्या चर्चने खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार असल्याचे सांगितले जाते आहे. तसेत एकनाथ शिंदे यांच्य़ा या बंडाला भाजपची (BJP) साथ आहे, असेही म्हटले जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे भाजपमध्ये सामील होतील का अशी चर्चा सुरू झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्य्द (Dipali Sayyed) यांनी ट्विट केले आहे.

"माननीय.एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांना भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुंनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही." असे त्यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही आमदार निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेची ३ मतं फुटली होती. पण आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदार असल्याने शिवसेना संकटात सापडल्याचे बोलले जात आहे.

Updated : 21 Jun 2022 5:50 AM GMT
Next Story
Share it
Top