Home > Politics > एकनाथ खडसेंना ईडीकडून अटकेच्या चर्चेवर रोहिणी खडसेंचा खुलासा

एकनाथ खडसेंना ईडीकडून अटकेच्या चर्चेवर रोहिणी खडसेंचा खुलासा

एकनाथ खडसेंना ईडीकडून अटकेच्या चर्चेवर रोहिणी खडसेंचा खुलासा
X

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याची अफवा जळगाव जिल्ह्यामध्ये पसरली आहे, ही केवळ अफवा असून एकनाथ खडसे हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत ते दोन दिवसात सर्वांशी संपर्क करतील असं राष्ट्रवादीचे नेत्या रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

सोबतच एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कोणतीही कारवाई झालेली नसून कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन रोहिणी खडसे यांनी केले आहे.भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजावल्याचे वृत्त काल समोर आलं होतं. दरम्यान यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं, दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ईडीचा गैरवापर करून महाविकास आघाडीतील नेत्यांना विनाकारण लक्ष्य केलं जातं असल्याचे म्हटले जात आहे.सोबतच राजकीय सूड भावनेतून ईडी सीबीआयचा वापर होत असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे.एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे.तर दुसरीकडे, स्वतः खडसेंची देखील या प्रकरणात चौकशी झाली आहे.या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील खडसेंचे फार्म हाऊस व निवासस्थान ईडीने सील केल्याची चर्चा काल जिल्ह्यात सुरू होती. खडसे यांना ईडीने ताब्यात घेतल्याची देखील चर्चा सुरू झाली, मात्र याबाबत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी माहिती देत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाही किंवा नोटीसही आलेली नाही, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

Updated : 30 Sep 2021 3:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top