Home > Politics > #MVA सरकार कोसळण्यात संजय राऊत जबाबदार आहेत का?प्रा. हरी नरके

#MVA सरकार कोसळण्यात संजय राऊत जबाबदार आहेत का?प्रा. हरी नरके

राज्यातील महाविकासाकडे सरकार कोसळल्यानंतर बंडखोर आमदाराकडून सातत्याने खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले जात आहे? सरकार कोसळण्याच्या कारणांवर अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी टाकलेला प्रकाश..

#MVA सरकार कोसळण्यात संजय राऊत जबाबदार आहेत का?प्रा. हरी नरके
X
राज्यातील महाविकासाकडे सरकार कोसळल्यानंतर बंडखोर आमदाराकडून सातत्याने खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले जात आहे? सरकार कोसळण्याच्या कारणांवर अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी टाकलेला प्रकाश..

संजय राऊत यांच्या तिखट भाषेमुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचा आरोप संघ - भाजपा कडून केला जात आहे.तोच राग आता आसामबापू आणि गँग आळवित आहे. हा युक्तीवाद आता काही लोकांना पटताना दिसतो आहे. मी राऊतांचा कधीही चाहता, कार्यकर्ता, समर्थक वा लाभार्थी नव्हतो. नाही.

१) राऊतांमुळे महाराष्ट्रात फूट पडली तर मग भाजपने कर्नाटक व मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारे का पाडली? तिथे तर संजय राऊत नव्हते ना? २) राजस्थानमध्ये ऑपरेशन कमळ अपयशी ठरले खरे,पण तिथे कोण होते संजय राऊत?

३) ही लबाड लांडगी कांगावे करणार नी इथले भाबडे लोक त्याला बळी पडणार.

४) तीलित तोमय्या, भातखळकर, चंपा, दरेकर, नाना फडणीस कोणत्या भाषेत बोलतात? त्यांना तोडीस तोड उत्तर देणारे एकटे राऊत आहेत. मविआ आघाडी प्रयोगाचे ते एक प्रमुख शिल्पकार असल्याने त्यांच्यावर भाजपाचा राग असणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या बतावणीला बळी पडणारे एक तर भाबडे आहेत किंवा शाळकरी.

५) राउतांवर राग होता म्हणून प्रताप सरनाईक, भावना गवळी, जाधव यांना इडीच्या नोटीसा देण्यात आल्या का? ते काहीही आरोप करणार आणि तुम्ही माना डोलवणार?

६) संजय राठोड यांचे मंत्रीपद ज्यांनी घालवले त्यांच्या गोटात राठोड गेलेत ते राऊतांमुळे का?

७) दीपक केसरकर राणे यांचे कट्टर विरोधक. आता केसरकर राणे यांच्या पक्षाशी सलगी करतात नी ते कांगावा करतात व तो तुम्हाला पटतो?

केसरकर वैश्य वाणी समाजाचे आहेत.त्यांच्या जातीला कोर्टाने ओबीसीतून बाहेर काढले होते.तेव्हा मी राज्य मागास वर्ग आयोगाचा सदस्य होतो.हेच दीपक केसरकर मला दररोज फोन करायचे. आपल्या आलिशान रिसॉर्ट/हॉटेल्सवर राहायला बोलवायचे. मी कधीही त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही. त्यांचा चहा सुद्धा घेतला नाही. सहा महिने अहोरात्र काम करून मी अहवाल लिहिला आणि वैश्यवाणी समाजाला ओबीसी मध्ये घ्यायला लावले.

८) त्यानंतर मात्र कधीही भेटले तरी केसरकर ओलखसुद्धा दाखवत नाहीत. असे हे "गरज सरो नी वैद्य मरोवाले" व्यापारी वृत्तीचे केसरकर! असो.

९) राऊतांना टार्गेट करणे ही भाजपची राजनीती आहे. राऊत लढतात हाच त्यांचा गुन्हा आहे.

:- प्रा. हरी नरके

Updated : 30 Jun 2022 9:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top