Home > Politics > एकनाथ शिंदे यांना Z सुरक्षा खरंच नाकारली गेली होती का?

एकनाथ शिंदे यांना Z सुरक्षा खरंच नाकारली गेली होती का?

एकनाथ शिंदे यांना Z सुरक्षा खरंच नाकारली गेली होती का?
X

महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन थेट उद्धव ठाकरे यांच्यावर बंडखोर आमदाराने आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतर त्यांना झेड सुरक्षा वाढवण्याची मागणी कऱण्यात आली होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा नाकारली असा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

तसेच त्यांच्या या आरोपाला एकनाथ शिंदे गटातील दादा भुसे यांनीही दुजोरा दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही यावर चर्चा झाली होती, पण एकनाथ शिंदे यांना वाढीव सुरक्षा देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला. पण त्यांच्या या आरोपा खासदार विनायक राऊत यांना उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांना वाढीव सुरक्षा तातडीने देण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला आहे.


did udhav Thackeray denied z security to then minister eknath shinde?

Updated : 22 July 2022 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top