Home > Politics > 'बेइमानी करून तुम्ही सत्तेत आलात'; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

'बेइमानी करून तुम्ही सत्तेत आलात'; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

बेइमानी करून तुम्ही सत्तेत आलात; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
X

नागपूर : भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 'जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राज ठाकरे यांना पक्ष का सोडावा लागला ? , नारायण राणे यांना पक्षातून बाहेर का केलं गेलं ? तुमच्याकडे संजय राऊत , सुभाष देसाई यांच्यासारखे नेते असताना तुम्ही मुख्यमंत्री का झालात? हे सांगावं. आता मुखवटा उतरून मान्य करा की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सोबतच राज्यात ईडी, सीबीआय येणाचे कारण आपले अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत, ईडी , सीबीआयला न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,केंद्र सरकारने नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही तसं असतं तर तुमचे अर्धे मंत्री जेलमध्ये असते, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

सोबतच मतांशी बेइमानी करून तुम्ही सत्तेत आलात असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला तुम्ही सरकार चालवून तर दाखवा असा आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

Updated : 16 Oct 2021 4:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top