News Update
Home > Politics > ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे : फडणवीस

ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे : फडणवीस

ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे : फडणवीस
X

अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खान क्रुझ पार्टीवरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. नवाब मलिकांच्या आरोपाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळच्या व्यक्तीलाही सोडण्यात आले. पण तो क्लीन असल्याने त्याचे नाव घेणार नाही. त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. एनसीबीने क्लिअर केले आहे. जे क्लीन होते त्यांना सोडण्यात आल्याचे सांगितले.

ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे एखादी एजन्सी कीड काढण्याचे काम करते, तेव्हा त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. कारण हा काही एका पक्षाचा प्रश्न नाही. त्यात राजकारण करणे चुकीचे असल्याचे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. ते

एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईत भाजपच्या नातेवाईकाला सोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्यावर बोललो आहे. आता बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणेही टाळले.

Updated : 10 Oct 2021 8:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top