Home > Politics > Karnataka Election : विलासराव देशमुख बनले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ढाल

Karnataka Election : विलासराव देशमुख बनले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ढाल

Karnataka Election : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटक निवडणूकीत सीमाभागात प्रचार करत असल्याच्या कारणावरून ठाकरे गट आणि काँग्रेसने हल्लाबोल सुरु केला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली आहे.

Karnataka Election : विलासराव देशमुख बनले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ढाल
X

कर्नाटक निवडणूकीवरून देशात राजकारण तापलं आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सीमाभागात प्रचार करत असल्याने संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्र सोडले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र यावेळी देवेंद्र फडणीस यांच्यासाठी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) ढाल बनले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना म्हटले की, भाजपा (BJP) हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगाव (Belgaon) येथे प्रचाराला आलो होतो. विलासराव देशमुख (Former CM of Maharashtra) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात प्रभारी होते. तेही सर्वत्र फिरले आहेत. मी स्वत: मराठी (Marathi) भाषिकांच्या मागे उभा आहे आणि आमचा पक्ष सुद्धा ठामपणे उभा आहे. संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. त्यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रचार कुठे करा आणि कुठे करु नका याबाबत सांगितले नाही. कारण ते येथे काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते, असेही फडणवीस म्हणाले.


Updated : 5 May 2023 5:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top