Home > Politics > सत्ता गेल्याने उध्दव ठाकरेंची टीका निराशेतून : देवेंद्र फडणवीस

सत्ता गेल्याने उध्दव ठाकरेंची टीका निराशेतून : देवेंद्र फडणवीस

सत्ता गेल्याने उध्दव ठाकरेंची टीका निराशेतून : देवेंद्र फडणवीस
X

सत्ताबदलानंतर सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (uddhav thackeray)विरूध्द शिंदे गट आणि भाजप असं वाकयुध्द पाहायल मिळत आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदालाचे मास्टरमाइंड असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत गणपती दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली होती त्यांच्या या टीकेला उध्दव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या याच प्रत्युत्तराला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंची सत्ता गेल्यामुळे आलेली निराशा असल्याचं म्हटलं आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलतान देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे, "सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना निराशा आली आहे. या निराशेतून ते बोलत आहेत. अशा निराश लोकांवर फार काही बोलायचं नसतं," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी म्हटलं आहे. दरम्यान दसरा मेळाव्याच्या वादावरही देवेंद फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली. "दसरा मेळाव्यासाठी सरकारने कोणतेही मैदान ब्लॅाक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदाने दिली जातील", असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे – अमित शाह (amit shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना (शिव sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. "त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे" असं विधान त्यांनी यावेळी केलं. शिवाय, ''भाजप आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे'', अशी भूमिका मांडत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून भाजप (BJP)आगामी निवडणुका लढवणार आहे, मुंबईसह महाराष्ट्रात यापुढे भाजपचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश अमित शाह यांनी नेतेमंडळींना दिले.

मंगलमुर्ती आणि अमंगलमुर्ती अशा दोघांनाही आपण पाहिलं – उध्दव ठाकरे

आपल्या सोबत असलेल्या आमदार आणि खासदारांची बैठक मंगळवारी उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीत त्यांनी "काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण. ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले. गणपतीच्या मंडळामध्ये सुद्धा त्यांना राजकारण दिसलं त्याला आपण काही करु शकत नाही. मी एवढं सांगेन की गणपती हा बुद्धीदाता आहे. सर्वांना त्याने सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे," अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.

याशिवाय, "काल ते येऊन बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवायची. दाखवा. ती जमीन दाखवल्यानंतर त्यावर काय बोलायचं ते बोलू. थोडक्यात सांगायचं तर आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहेत. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला," असा संवाद उध्दव ठाकरेंनी आपल्या उर्वरीच आमदार आणि खासदारांशी साधला होता.

Updated : 7 Sep 2022 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top