Home > Politics > नवाब मलिक यांच्या आरोपादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट; म्हणाले, डुकराशी कुस्ती...

नवाब मलिक यांच्या आरोपादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट; म्हणाले, डुकराशी कुस्ती...

नवाब मलिक यांच्या आरोपादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट; म्हणाले, डुकराशी कुस्ती...
X

आर्यन खान प्रकरण आता वेगळं वळण घेताना दिसत आहे. आर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन गौप्यस्फोट करणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि त्याचद्वारे ते लोकांकडे खंडणी वसूल करायचे असा आरोप नवाब मलिकांनी केले आहेत फडणवीस यांच्या आशीर्वादाने'च महाराष्ट्रात वसूली आणि बनावट नोटांचं रॅकेट खुलेपणाने सुरु होतं. समीर वानखेडे या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी फडणवीसांकडून संपूर्ण प्रकरणाचं लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

असा आरोप मलिक यांनी केला आहे. मात्र, या आरोप प्रत्यारोपाच्या दरम्यान फडणवीस यांनी केलेले ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

फडणवीस यांनी इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या पुस्तकातील एक कोट ट्वीट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात 'मी फार आधीच शिकलोय की, डुकराशी कुस्ती खेळायची नसते. अशी कुस्ती खेळून तुम्ही स्वतः तर घाणीने माखून जाताच, पण यात डुकरालाच मजा येत असते.' असं ट्वीट केलं आहे. मात्र, फडणवीस यांनी हे ट्वीट मलिक यांच्यावर निशाणा साधण्यासाठी केले आहे. अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Updated : 10 Nov 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top