Home > Politics > दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, देवेंद्र फडणवीस यांचा मलिक यांना इशारा

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, देवेंद्र फडणवीस यांचा मलिक यांना इशारा

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, देवेंद्र फडणवीस यांचा मलिक यांना इशारा
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ड्रग्जचा उद्योग करणाऱ्यांचे सूत्रधार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच अमृता फडणवीस यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो ट्विट करत ती व्यक्ती ड्रग्जचा व्यवसाय करणारी असल्याचा आरोप करत मलिक यांनी चौकशीची मागणी केली आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. तसेच नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे आणि पण दिवाळी झाल्यानंतर आपण बॉम्ब फोडणार आहोत, आपण काचेच्या घरात राहत नाही, ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत अशा लोकांनी आपल्यासोबत बोलू नये, असा टोला त्यांनी मलिक यांना लगावला. यासंदर्भातील पुरावेही सादर करु असे सांगत ते पुरावे शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे, पण शेवट आपण करु असा इशाराही फडणवीस यांनी केला आहे.

मलिक यांनी सोमवारी सकाळी भाजप आणि ड्रग्ज माफियांचे संबंध असल्याचा आरोप केला, तेसच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती व्यक्त ड्रग्ज विकणारी असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. चलो आज भाजप और ड्रग्स पेडलर के रिश्तों पर चर्चा करते है असे ट्विट करत मलिक यांनी फोटो शेअर केला आहे.

पण या फोटोबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रिव्हरमार्चने या व्यक्तीला भाड्याने कामावर घेतले होते, रिव्हरमार्चच्या कार्यक्रमा दरम्यान हा फोटो घेतला गेला होता आणि रिव्हरमार्चने तसे स्पष्टीकरणही दिले आहे. त्यामुळे आपल्या पत्नीचा फोटो शेअर करण्यामागे मलिक यांची मानसिकता दिसते, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

Updated : 1 Nov 2021 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top