Home > Politics > फडणविसांची विरोधकांना रामदास आठवले स्टाईलमध्ये उत्तर....

फडणविसांची विरोधकांना रामदास आठवले स्टाईलमध्ये उत्तर....

फडणविसांची विरोधकांना रामदास आठवले स्टाईलमध्ये उत्तर....
X

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चवेळी अर्थमंत्री अणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितेच्या स्टाईल वापरुन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेले विधानही चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये फडणवीस यांनी विधान करत सभागृहात हास्यकल्लोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे ( Republican Party of India ) नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) , यांची कविता ऐकली नसेल असा महाराष्ट्रातील एकही राजकिय व्यक्ती भेटण अवघड आहे. त्यांच्या संसदेतील कविता असो किंवा जाहीर सभेतील कविता असो किंवामग त्यांची सभेतली भाषण आसो त्याची जोरदार चर्चा असते. त्यातून ते कधी कुणावर टीका करत असतात कुणाची स्तुती करत असतात तर कधी. कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करणारे नेते म्हणून रामदास आठवले महाराष्ट्रालाच नाहीतर संपूर्ण देशाला परिचित आहेत. ह्याच स्टाईलचा आधार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले होते. त्यावर विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत असतांना एकनाथ शिंदे (Eknarh Shinde)यांच्या बंडाचा आधार घेऊन टोला लागवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची आत्ताच्या आकडेवारीचा आणि जुन्या आकडेवारीचा फरक सांगत शिवसेनेला ( Shivsena ) किती टक्के निधी दिला जात होता हे स्पष्ट करत असतांना रामदास आठवले यांच्या बोलण्याच्या शैलिचा आधार घेऊन विधान केले आणि सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, रामदास आठवले यांच्या स्टाइलमध्ये सांगायचे झाले तर तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी असं विधान केले. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांना देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे शांतता पसरलेल्या सभागृहात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय ( Dhananjay Mundhe ) मुंडे यांनी फडनविसांणी सादर केलेला अर्थसंकल्प Copt + Edit + Paste असल्याच म्हटलं होतं. त्यावर फडनविसांणी आज विधानसभेत उत्तर दिलं. आमचा अर्थसंकल्प कॉपी-ईडीट-पेस्ट नव्हे तर कंट्रोल-अल्ट-शिफ्ट असा अर्थसंकल्प आहे. असं देवेद्र फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंढे यांना अर्थसंकल्प कॉपी-ईडीट-पेस्ट वाटला पन मी त्यांना सांगुईच्छितो की हा अर्थसंकल्प अर्थसंकल्प कॉपी-ईडीट-पेस्ट नाहीये तर कंट्रोल-अल्ट-शिफ्ट असा अर्थसंकल्प आहे. असं देवेद्र फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंडेना शायरीतून प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंढे यांनी सरकार वर टिका करताना शायरीतुण आपल्या भावना व्याक्त केल्या होत्या "ईत्र से कपडोकों महकाना बडी बात नही......मजा तो तब है जब खुशबु आपके किरदार से आये...."असं धनजय मुंडे म्हणाले होते. त्यवर फडणवीसांनीही शायरीतुन उत्तर दिल आहे. "दुआ करो की सलामत रहे मेरी यह एक चिराग कही आँधिंयो पे भरी है. मुश्कीले जरुर है मगर ठहरा नही हु मै, मंझिल से जरा कहदो, अभी पहुचा नही हुँ मैं". अस देवेद्र फडणविस म्हणाले

Updated : 15 March 2023 1:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top