Home > Politics > भाजप-मनसे युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

भाजप-मनसे युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

भाजप-मनसे युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
X

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलतांना फ़डणवीस यांनी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली. मेट्रोला जसं डबल इंजिनची आवश्यकता नाही तसं 2024 ला सुद्धा आम्ही सिंगल इंजिनवरच येणार, असे वक्त्व्य फडणवीस यांनी केले आहे. मनसे –भाजप एकत्र येणार का या प्रश्नावर फडणवीस यांनी हे उत्तर देत गूढ कायम ठेवले आहे. इंजिन ही मनसेची निवडणऊक निशाणी असल्याने पत्रकारांनी आणखी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. "भाजप-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच 2024च्या निवडणुकीत भाजपचे एकच इंजिन असेल" असे म्हणत फडणवीस यांनी मनसेबाबतच सस्पेन्स कायम ठेवला आहे.

याआधी शुक्रवारी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत स्वतंत्रपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पण अशा बैठका पक्षीय पातळीवर सातत्याने होत असतात, त्यामुळे या बैठकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलाची कोणतीही चर्चा नाही, चंद्रकांत पाटील हे उत्तम पद्धतीने काम करत आहे, त्यांच्यामागे हायकमांड आणि पक्ष भक्कमपणे उभा आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Updated : 8 Aug 2021 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top