Home > Politics > बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी मी अयोध्येत होतो – देवेंद्र फडणवीस

बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी मी अयोध्येत होतो – देवेंद्र फडणवीस

बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी मी अयोध्येत होतो – देवेंद्र फडणवीस
X

बाबरी मशीद पाडली तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपला होता, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. बाबरी मशीद नव्हती तर तो ढाचा होता आणि तो ढाचा पाडण्यासाठी आपण स्वत: तिथे उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच बाबरीचा तो ढाचा कारसेवकांनी पाडला, कल्याण सिंग यांनी कारसेवकांवर मुद्द्या गोळ्या चालवल्या नाही, उलट रामासाठी आपल्या सरकारचा बळी दिला, असेही यावेळ फडणवीस यांनी सांगितले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. तसेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा शिवसेनेचा आरोप फेटाळून लावत "मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही, मुंबई कधीही महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही" असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Updated : 1 May 2022 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top