Home > Politics > उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, कोल्हापूर पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, कोल्हापूर पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

राज्यातील महापुरासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोल्हापूर दौरा केला होता या पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, कोल्हापूर पूरासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
X

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे तब्बल ९ जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. सध्या बऱ्याच ठिकाणी पूराचं पाणी ओसरलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून या पुरग्रस्त भागाचे पाहणी दौरे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तेथील पाहणी करून त्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी या दौऱ्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात पूर आला होता. येथील पद्माराजे विद्यालय येथील पूरग्रस्त निवारा केंद्रात आश्रयाला असणाऱ्या गावकऱ्यांची भेट घेतली; त्यांची विचारपूस केली. तसेच जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे उपस्थित होते.

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार असल्याची घोषणा केली. पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवाय पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचनादेखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. वाहतुक सुरू करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करून रस्ते सुरू केले जातील. तसेच पावसाळा संपला की बॉक्स अथवा स्लॅब प्रकारचे पुल बांधले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून पूरपरीस्थितीची माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यात पुरस्थिती ओढवू नये म्हणून समिती नेमणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मदत मंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Updated : 27 July 2021 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top