Home > Politics > ...अन्यथा ग्लोबल हॉस्पिटल बंद पाडू; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा

...अन्यथा ग्लोबल हॉस्पिटल बंद पाडू; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा

...अन्यथा ग्लोबल हॉस्पिटल बंद पाडू; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा
X

ठाणे : ठाण्यातील ग्लोबल कोविड हॉस्पिटल येथे कोविड काळापासून डॉक्टर,नर्सेस, तसेच वार्ड बॉय हे काम करत आहे. परंतु अनेक वेळा या डॉक्टर नर्सेस तसेच वोर्ड बॉय यांना कामावरून काढून टाकण्याच्या घटना घडल्या त्यातच काल रात्री सुद्धा ग्लोबल कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या वोर्ड बॉय, नर्स तसेच डॉक्टरांना कामावरून काढून टाकण्याचे मेसेज द्वारे कळवण्यात कळवण्यात आले.

या गोष्टीचा विरोध म्हणून आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी हॉस्पिटल व अतिरिक्त आयुक्त यांच्याशी चर्चा करून तेथे काम करणाऱ्या डॉक्टर नर्स तसेच वोर्ड बॉय यांना कामावरून काढून टाकले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले.

ग्लोबल कोविड सेंटर येथे आपला जीव धोक्यात घालून येथील डॉक्टर नर्स तसेच वोर्ड बॉय हे काम करत आहेत. या सर्वांमुळे रुग्णांचे हे जीव वाचलेले आहेत. त्यामुळे यांना कामावरून काढून न टाकता कामावर समाविष्ट करून घेण्याची मागणी कामगारांच्या वतीने प्रवीण दरेकर यांनी केली.

या काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेस वॉर्ड बॉय यांना काढून टाकण्यात आले तर येत्या काळात भाजपाकडून मोठ्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

Updated : 18 Aug 2021 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top