Home > Politics > मंदिरातील भिकारी आणि पुजाऱ्याची अवस्था सारखीच ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी महामंडळ उभारा: आमदार संजय गायकवाड

मंदिरातील भिकारी आणि पुजाऱ्याची अवस्था सारखीच ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी महामंडळ उभारा: आमदार संजय गायकवाड

मंदिरातील भिकारी आणि पूजा करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. राज्यातील अनेक ब्राह्मणबांधवांची अवस्था बिकट असल्यामुळे आता ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

मंदिरातील भिकारी आणि पुजाऱ्याची अवस्था सारखीच ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी महामंडळ उभारा: आमदार संजय गायकवाड
X

ब्राह्मण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज विधानभवनात लक्षवेधीद्वारे मांडली. गायकवाड म्हणाले की, राज्यातील अनेक ब्राह्मण बांधवांची अवस्था बिकट आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी गोवंश तसेच शेतीविषयक, विहिरीविषयक, फूडपार्क संबंधी महत्वाचे मुद्दे सभागृहात उपस्थित केले.

यामध्ये यामध्ये बोलताना सांगितले की शेतकरी हा सर्वच पक्षाचा केंद्रबिंदू आहे परंतु शेतकऱ्यावरची संकट, अडचणी कधीही संपत नाही हे वास्तव असल्याचे सांगितले. परंतु हे संपवण्याकरिता काही कायमस्वरूपी पाऊल उचलू शकतो की नाही हे देखील तपासण्याची आवश्यकता निर्माण झालेली असल्याचे सांगितले. जर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी, वीज मिळाली, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तर त्यांना सरकारची कोणतीही कर्जमाफी किंवा कर्जही नको, जर शेतकरी शेती प्रक्रियेवर प्रक्रिया उद्योग उभा करू शकला तर निश्चितपणे त्यांना कुठल्याही मदतीची गरज भासणार नाही असे देखील सांगितले.

खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी सरकारने अमृत योजना सुरू केली आहे. मंदिरातील भिकारी आणि पूजा करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना कोणत्याही महामंडळाकडून लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. या मागणीवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले.

Updated : 11 March 2023 3:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top