Home > Politics > महाराष्ट्रानंतर आज दिल्ली विधानसभेतही खोक्याच्या घोषणा

महाराष्ट्रानंतर आज दिल्ली विधानसभेतही खोक्याच्या घोषणा

महाराष्ट्रानंतर आज दिल्ली विधानसभेतही खोक्याच्या घोषणा
X

महाराष्ट्र विधीमंडळात 50 खोक्के एकदम ओक्के अशा घोषणा लावत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. आज दिल्लीतही विधानसभेत अशाच प्रकारे घोषणा देण्यात आल्या. दिल्लीत उत्पादन शुल्क धोरणावरून सध्या भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये राजकीय वाद सुरु आहे. आम आदमी पक्षाने भाजपकडून त्यांच्या पक्षाच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आज दिल्ली विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं होतं.

अधिवेशनादरम्यान आम आदमी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत 'खोखा-खोखा 20 खोखा'च्या घोषणा दिल्या. (एक खोक्याचा अर्थ एक कोटी.) आम आदमी पक्षाच्या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनीही घोषणाबाजी केली. राजधानी दिल्लीत भाजप 'ऑपरेशन लोटस' राबवत असल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीला ९ आमदार अनुपस्थित होते. या अनुपस्थित आमदारांमध्ये मनीष सिसोदिया यांचाही समावेश होता.

त्यानंतर केजरीवाल यांनी भाजपवर भाजप आमच्या 40 आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिली जात आहे. भाजपला 800 कोटी खर्च करून दिल्ली सरकार पाडायचे आहे. असे आरोप केले होते.

त्यानंतर दिल्ली सरकारचं दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनादरम्यान भाजप विरोधात मोठी घोषणा बाजी करण्यात आली. 70 जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत आपकडे 62 आणि भाजपकडे 8 जागा आहेत.

Updated : 26 Aug 2022 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top