Home > Politics > सुनिल केदार दिल्ली दौऱ्यावर, पक्षश्रेष्ठींची भेट घेणार का? म्हणाले…

सुनिल केदार दिल्ली दौऱ्यावर, पक्षश्रेष्ठींची भेट घेणार का? म्हणाले…

सुनिल केदार दिल्ली दौऱ्यावर, पक्षश्रेष्ठींची भेट घेणार का? म्हणाले…
X

क्रीडा मंत्री सुनील केदार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. विदर्भातील काही काँग्रेस आमदार नाराज असून ते काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचे भेट घेणार असल्याचं मध्यंतरी वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर केदार यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

काँग्रेस आमदारांची कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने पक्षश्रेष्ठींसोबत भेट होऊ शकली नव्हती. दरम्यान मध्यंतरी मंत्री सुनिल केदार आणि नितीन राऊत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठीची भेट घेतली होती. यावेळी नितीन राऊत आणि सुनिल केदार यांना पक्षश्रेष्ठींनी विधानपरिषदेची नागपूरची जागा का गेली? असा सवाल केला होता. त्या भेटीनंतर सुनिल केदार यांनी 'पक्ष महत्त्वाचा आहे'. असं म्हणत माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

त्यानंतर आज केदार यांना पक्षश्रेष्ठींची भेट घेणार का? असा सवाल केला असता, काँग्रेस श्रेष्ठींची भेट सध्या तरी घ्यायची नाही तरी कोरोना असल्या कारणाने तसं शक्य नाही. मात्र, समजा असा काही विषय असला तर दोन दिवसांनी येऊन पुन्हा प्रयत्न करणार. अशी माहिती केदार यांनी यावेळी दिली तसंच

काॅंग्रेस मधील नाराज आमदार दिल्लीत येणार असल्याबाबत विचारले असता हा विषय प्रसारमाध्यमातून कळल्याचं केदार यांनी म्हटलं आहे. दरम्यान केदार यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटी संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला… ते म्हणाले महाराष्ट्रातील क्रीडा विभागासंबंधी त्यांच्याशी चर्चा करायची होती. कोरोनाच्या अगोदर ज्या खेलो इंडियाच्या स्पर्धा देशस्तरावर झाल्या. त्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आला आहे. मात्र, आता हरियाणामध्ये होत असलेल्या स्पर्धांसाठी महाराष्ट्रातील काही खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायडर्स लावण्यात आले आहे.

याच संदर्भात महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी मी इथे आलो होतो. यासोबतच केंद्रशासनाच्या खेलो इंडिया खेलो या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या स्टेडियमला आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे मांडला असून महाराष्ट्राला तातडीने मदत करा. अशी भूमिका देखील मांडली आहे .

अनुराग ठाकूर स्वतः खेळाडू राहिले असल्याने ते नक्कीच यावर विचार करून मदत करतील अशी मला खात्री आहे. अशी प्रतिक्रिया क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

Updated : 10 Jan 2022 11:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top