Home > Politics > माझं खातं रिकामं तर भगवंत मान माझ्यापेक्षाही फक्कड, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य

माझं खातं रिकामं तर भगवंत मान माझ्यापेक्षाही फक्कड, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य

दिल्लीपाठोपाठ पंजाब जिंकल्याने अरविंद केजरीवाल यांचा विश्वास चांगलाच वाढला आहे. त्यातच आता डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी केजरीवाल यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान केजरीवाल यांनी माझं अकाऊंट रिकामं असल्याचं वक्तव्य केलं आहे.

माझं खातं रिकामं तर भगवंत मान माझ्यापेक्षाही फक्कड, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
X

डिसेंबर 2022 मध्ये गुजरात विधानसभा होणार आहे. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच अरविंद केजरीवाल सोमवारी गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे बोलत असताना म्हणाले की, माझं अकाऊंट रिकामं आहे तर भगवंत मान माझ्यापेक्षाही फक्कड आहे.

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरात परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे डिसेंबर 2022 नंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. एवढंच नाही तर केंद्रीय गुप्तचर विभाग IB ने गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला 95 जागा मिळणार असल्याचा रिपोर्ट दिल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील नागरिकांनी 70 पैकी 67 जागा आपच्या पारड्यात टाकल्या. पंजाबच्या नागरिकांनी 117 पैकी 92 जागा आपला मिळवून दिल्या. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबपेक्षा गुजरातही मागे नाही. म्हणून गुजरातमध्ये आपला 150 जागा जिंकायच्या आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

आपल्याला ही निवडणूक सत्याच्या जीवावर जिंकायची आहे. त्यामुळे विरोधकांकडे खूप पैसा आहे. मात्र माझं अकाऊंट रिकामं आहे आणि भगवंत मान तर माझ्यापेक्षाही फक्कड आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

किती आहे केजरिवाल यांची संपत्ती?

मॅक्स महाराष्ट्रने दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 च्या निवडणूक पत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 9 लाख 95 हजार 741 रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे 57 लाख 07 हजार 791 रुपयांची मालमत्ता आहे.याबरोबरच स्थावर मालमत्तेमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 2 कोटी 77लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यापैकी 1 कोटी 77 लाख रुपयांची शेतीविरहीत जमीन आहे. 1 कोटी रुपयांचे राहते घर आहे. याबरोबरच अस्थायी मालमत्तेपैकी बँक खात्यात 12 हजार रुपये तर बँकेत डिपॉझिट केलेले आणि इतर ठिकाणी गुंतवणूक केलेली रक्कम ही 33 लाख 29 हजार 205 रुपये इतकी होती. बाँड आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये 15 लाख 31 हजार 665 रुपये इतकी गुंतवणूक आहे. याबरोबरच 6 लाख 20 हजार रुपयांचे वाहन आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 12 लाख 40 हजार रुपयांची ज्वेलरी आहे. त्यामुळे या सर्वांची एकूण किंमत ही 67 लाख रुपयांचा आकडा पार करते. मात्र तरीही अरविंद केजरीवाल यांनी आपले खाते रिकामे असल्याचा दावा केला आहे.








Updated : 3 Oct 2022 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top