Home > Politics > राज्यसभा निवडणूक : क्रॉस वोटिंग पडले महागात, हकालपट्टीनंतर भाजप आमदाराची आमदारकी रद्द होणार?

राज्यसभा निवडणूक : क्रॉस वोटिंग पडले महागात, हकालपट्टीनंतर भाजप आमदाराची आमदारकी रद्द होणार?

राज्यसभा निवडणूक : क्रॉस वोटिंग पडले महागात, हकालपट्टीनंतर भाजप आमदाराची आमदारकी रद्द होणार?
X

10 जून रोजी देशात राज्यसभेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीचे धक्कादायक निकाल आले होते. त्यातच भाजप आमदाराने काँग्रेसला मतदान केल्याने भाजपने आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर यामुळे आमदाराला क्रॉस वोटिंग महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10 जून रोजी पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत राजस्थान भाजपच्या शोभाराणी कुशावाह यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. तर यामुळे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार असलेल्या सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपने आमदार शोभाराणी कुशवाह यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपला धक्का

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या छावणीत भाजप क्रॉस व्होटिंग करणार असल्याची चर्चा राजस्थानच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मतदानाच्या शेवटच्या प्रसंगी भाजप आमदार शोभाराणी यांनी काँग्रेसच्या बाजूने क्रॉस वोटिंग केले. त्यामुळे 1 मताने काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांचा विजय झाला. अशा प्रकारे जयपूरमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने तीन जागा जिंकल्या.

या परिस्थितीत भाजप आमदार शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना क्रॉस व्होटिंग करून मतदान केले. त्यानंतर पक्षाने कारवाई करत काही दिवसांपूर्वी शोभरानी यांना निलंबित केले हेते. आता भाजपने या आमदारास निलंबित केले आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (जीसी कटारिया) यांनी शोभाराणी यांच्याकडे ७ दिवसांत उत्तर मागितले होते. मात्र शोभाराणी कुशवाह यांनी भाजपवरच गंभीर आरोप केले. त्यामुळे भाजपने शोभरानी यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले होते. आता पक्षाने शोभाराणी यांच्या विरोधात कडक पावले उचलत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे

शोभाराणी यांची आमदारकी रद्द होणार?

राज्यसभा निवडणूकीत शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेस उमेदवाराला क्रॉस वोटिंग केले होते. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. तसेच पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यात येणार आहे. मात्र पक्षशिस्तीचा भंग केल्यानंतर भाजपकडून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे शोभाराणी यांच्या हकालपट्टीनंतर त्यांची आमदारकी जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांचे वक्तव्य

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शोभा राणी कुशवाह यांनी काँग्रेसला मतदान केले आहे. त्याबद्दल तो त्यांचे आभार मानतो. गेहलोत म्हणाले की, शोभा राणी यांनी भाजपच्या हॉर्स ट्रेडिंगच्या हेतूने नाराज होऊन काँग्रेसला हे मत दिले आहे. दुसरीकडे, शोभा राणी यांनी ज्या प्रांजळपणाने काँग्रेसला मतदान केले आहे, ते मान्य केले आहे. त्याचे क्रॉस व्होट हे आधीच ठरलेले दिसते. असे मत मुख्यमंत्री गेहलोत यांनी व्यक्त केले होते.

Updated : 16 Jun 2022 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top