Home > Politics > '...तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका' ; सामनाच्या अग्रलेखातून इशारा

'...तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका' ; सामनाच्या अग्रलेखातून इशारा

...तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका ; सामनाच्या अग्रलेखातून इशारा
X

मुंबई मागील दीड वर्षापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात या ना त्या कारणाने सातत्याने संघर्ष होताना दिसून येत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर रंगलं. आता राज्यातील महिला असुरक्षित असल्याचा मुद्दा पुढे करुन कायदा आणि सुवस्थेच्या प्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.त्यावरून राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांच्या या पत्राला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून खरमरीत उत्तर दिलं. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या सरकारचे ज्या राज्यांमध्ये सरकार नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच 'रोल' अदा करत आहेत आणि अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात.असं सामनातून म्हटले आहे.

सोबतच पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांच्या पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, 'महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका' असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Updated : 23 Sep 2021 2:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top