Home > Politics > कश्मीरातून हिंदूंचे पलायन...भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही- सामना

कश्मीरातून हिंदूंचे पलायन...भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही- सामना

कश्मीरातून हिंदूंचे पलायन...भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही- सामना
X

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आपल्या अस्तित्वालाच आव्हान देतील, असा इशारा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे. कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून

जे उपद्व्याप केले जात आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची 'अलोकशाही' राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. त्यामुळे भारताने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आपल्या अस्तित्वालाच आव्हान देतील, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे. तसंच देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे, अशी उपमा देत केंद्र सरकारला सामनातून सल्लाही देण्यात आला आहे.

दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढलाय. कश्मीर खोऱ्यामध्ये निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारलं जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी जातात, या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे असं सामानातून म्हटले आहे. एवढे बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? हा प्रश्नच आहे. उलट अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान जास्तच शिरजोर झाला आहे व त्यामुळेच कश्मीर खोऱ्यांत हिंसाचार वाढला आहे. मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरु व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. असा टोला सामनातून लगावण्यात आला. दहशतवादाच्या भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत. आपली घरेदारे, जमीनजुमले मागे टाकून पळत आहेत. या सगळ्या लोकांचे दुःख पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे.असं सामनातून म्हटले आहे.

Updated : 13 Oct 2021 2:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top