Home > Politics > अजय मिश्रा यांचेही राज्यमंत्रिपद जाण्याची शक्यता ; उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याकडूनच टीका

अजय मिश्रा यांचेही राज्यमंत्रिपद जाण्याची शक्यता ; उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याकडूनच टीका

अजय मिश्रा यांचेही राज्यमंत्रिपद जाण्याची शक्यता ; उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याकडूनच टीका
X

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील घटनांमुळे भाजपची केंद्रीय नेतृत्वाची चिंता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने चिरडण्यात आले, त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष यांना अटक झाली, या प्रकरणावरून अजय मिश्रा यांचेही राज्यमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. लखीमपूरमध्ये घटनेवेळी ६४ मिनिटांच्या काळात आपण कुठे होतो, याचा खुलासा आशिष मिश्रा यांना करता आलेला नाही. त्याने पोलिसांना काही व्हिडिओ सादर करण्यात आले आहे. पण त्यातूनही आपण वाहनांत किंवा त्या ठिकाणी नव्हतो, असे आशिषला सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळेच त्याला अटक झाली. यानंतर भाजप नेत्यांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यापासून दूर राहणेच ठरवल्याचे पाहिलं मिळत आहे . एवढेच नाही, तर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी थेट भर सभेतच अजय मिश्रा यांचे नाव न घेता कान टोचले आहे.

'नेतागिरीचा अर्थ फॉरच्युनरखाली लोकांना चिरडणे, त्यांना लुबाडणे असा होत नाही, तुम्ही कसे वागता, हे पाहूनच लोक तुम्हाला मते देतात', असे त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष सातत्याने मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, त्यांच्यामुळे मिश्रा यांच्यावर कारवाई करावी, असा प्रदेश भाजपच्या नेत्यांचा आग्रह आहे.

Updated : 12 Oct 2021 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top