Home > Politics > #राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर्स लावून नियमांचं उल्लंघन

#राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर्स लावून नियमांचं उल्लंघन

#राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर्स लावून नियमांचं उल्लंघन
X

सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या राणा दाम्पत्यांच्या अडचणी थांबायला तयार नाहीत. देशद्रोहाच्या आरोपात जेलवारी झाल्यानंतर अमरावतीमध्ये राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण करुन मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावून कार्यक्रम घेतला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीत 36 दिवसांनी परतलेल्या राणा दाम्पत्याचं काल जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं. स्वागतादरम्यान नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा पठण आणि हनुमानाची आरती सुरु होती.रात्री दहानंतर लाऊड स्पीकर्सची परवानगी नाही हे स्पष्ट असतानाही देखील राणा समर्थकांनी लाऊड स्पीकर सुरु ठेवले होते. त्यामुळं आता अमरावती पोलीसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती येथील शंकर नगर येथील राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केले. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत लाऊडस्पिकर लावून कार्यक्रम घेतला त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरून 341, 188, 134, 135 कमल 15 पर्यावरण संवर्धन अधिनियम 1986 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीवरून युवा स्वाभिमानचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, अजय मोरया, जयश्री मोरया, जितू दुधाने, बाळू इंगोले प्रवीण गुल्हाने, साक्षी उमप अधिक 8 ते 10 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर्स लावून नियमांचं उल्लंघनमागील काळात मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निश्चय राणा दाम्पत्याने केला होता. त्यावरून राणा दाम्पत्याला 14 दिवस मुंबईमध्ये तुरुंगवारी झाली होती. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला. या घटनेनंतर तब्बल 36 दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले.

Updated : 29 May 2022 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top