Home > Politics > जन आशीर्वाद यात्रा : 6 गज की दूरी, मास्क है जरुरी !

जन आशीर्वाद यात्रा : 6 गज की दूरी, मास्क है जरुरी !

जन आशीर्वाद यात्रा :  6 गज की दूरी, मास्क है जरुरी !
X

6 गज की दूरी, मास्क है जरुरी, कोरोनाविरोधातल्या लढाईत हा मंत्र कायम लक्षात ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी वारंवार करत आहेत. पण मोदींच्या या मंत्राचा त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजप कार्यकर्त्यांना विसर पडला आहे. सध्या राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना निर्बंध धाब्यावर बसवले गेल्याचे चित्र दिसते आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रीपदी नियुक्त झालेल्या 4 मंत्र्यांची सध्या राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रांना त्या त्या भागात सुरूवात झाली आहे. पण या यात्रांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांचा विसर सगळ्यांना पडला आहे का, असा सवाल उपस्थित.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या संदर्भात अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राजकीय कार्यक्रमांना गर्दी करु नये असे आवाहनही केले जात आहे. पण तरीही मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे यासारखे प्रकार सर्रास सुरू आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये जनआशीर्वाद यात्रे दरम्यान कोरोनाच्या निर्बंधांचे पालन केले नाही म्हणून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

Updated : 19 Aug 2021 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top