Home > Politics > देशाला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ'चा धोका : रघुराम राजन यांचा इशारा

देशाला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ'चा धोका : रघुराम राजन यांचा इशारा

खाजगी क्षेत्रातील रोडावलेली गुंतवणूक, महागडे व्याजदर आणि मंदावलेला जागतिक विकास दर यामुळे भारत 'हिंदू विकास दरा'च्या अगदी जवळ आल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.

देशाला हिंदू रेट ऑफ ग्रोथचा धोका : रघुराम राजन यांचा इशारा
X

आगामी आर्थिक वर्षात (२०२३-२४) भारताच्या विकासाला ५ टक्के वाढ मिळाली तरी ते आपले नशीब असेल. प्रोफेसर राजकृष्ण यांनी ५० ते ७० च्या दशकातील कमी आर्थिक वाढीसाठी 'हिंदू वाढीचा दर' हा शब्द वापरला होता. हिंदू रेट ऑफ ग्रोथची पुन्हा एकदा चर्चा होत आहे हिंदू रेट ऑफ ग्रोथचा दर धर्मशास्त्राशी नसून अर्थशास्त्राशी संबंधित आहे. एक आर्थिक संज्ञा आहे, जी प्राध्यापक राज कृष्णा यांनी दिली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी हिंदू विकास दराबाबत इशारा दिला आहे. कमकुवत खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक, उच्च व्याजदर आणि मंदावलेला जागतिक विकास दर यामुळे भारत 'हिंदू विकास दरा'च्या अगदी जवळ आला आहे, असे त्यांनी म्हटले. राजन यांनी म्हटले की राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजानुसार तिमाही वाढीमध्ये हळूहळू घट झाल्याचे दिसून येते, जी चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत ६.३% आणि पहिल्या तिमाहीत १३.२% वरून ४.४ टक्क्यांवर घसरले असून गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर ५.२ टक्के होता.

'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणजे नेमकं काय?

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या खूप अप्रगत होता. देशात मोठ्या प्रमाणावर गरिबी आणि साधनांची कमतरता होती. अशा स्थितीत १९५१ ते १९८० या काळात जवळपास तीन दशके देशाचा विकास दर अत्यंत संथ होता. देशातील सरासरी विकास दर ४ टक्क्यांच्या खालच्या पातळीवर होता, यालाच 'हिंदू वाढीचा दर' असं संबोधलं जातं. संथ वाढीसाठी 'हिंदू विकास दर' हा शब्द भारतीय अर्थशास्त्रज्ञ राज कृष्णा यांनी १९७८ मध्ये प्रथम वापरला होता.१९९१ मध्ये आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणाच्या सुरुवातीनंतर 'हिंदू वाढीचा दर' मंद गती सोडून देशाचा विकास दर झपाट्याने वाढला. विशेषतः २००३ ते २००८ या काळात देशाचा विकास दर सरासरी ९ टक्के इतका होता. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राजन यांना चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाच्या विकासाबाबत बोलताना सांगितले की पाच टक्के वाढ झाली तर त्यांना नशीब म्हणावे. ऑक्टोबर-डिसेंबरमधील जीडीपी आकडेवारी दर्शवते की वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वाढ कमजोर होईल. त्यांनी म्हटले, "माझी भीती विनाकारण नाही. आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ४.२ टक्के वाढीचा अंदाजही व्यक्त केला आहे." राजन पुढे म्हणाले, सध्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत सरासरी वार्षिक वाढ ३.७ टक्के आहे, जी जुन्या 'हिंदू विकास दराच्या अगदी जवळ असून ते भीतीदायक आहे. आपल्याला यापेक्षा चांगले करायचे आहे. परंतु, सरकार पायाभूत गुंतवणुकीच्या आघाडीवर काम करत आहे, मात्र उत्पादनावरील जोराचा परिणाम अद्याप दिसणे बाकी आहे, असेही त्यांनी कबूल केले.

Updated : 6 March 2023 7:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top