Home > Politics > ईडी, सीबीआयाचा वापर करून मंत्रिमंडळाला बदनाम करण्याचे षढयंत्र- जयंत पाटील

ईडी, सीबीआयाचा वापर करून मंत्रिमंडळाला बदनाम करण्याचे षढयंत्र- जयंत पाटील

ईडी, सीबीआयाचा वापर करून मंत्रिमंडळाला बदनाम करण्याचे षढयंत्र- जयंत पाटील
X

अहमदनगर : ईडी,सीबीआयचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गुन्हे दाखल करून सरकारला बदनाम करण्याचे षढयंत्र सुरू असून, ज्यांनी खरे आर्थिक घोटाळे करून भाजपात प्रवेश केला आहे ते भाजपच्या आशीर्वादाने शाबूत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

खडसे, त्यांचे जावई तसेच हसन मुश्रीफ आदींवर होत असलेल्या चौकश्या या राजकीय हेतून प्रेरित असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. सोबतच इतर पक्षातून भाजपात गेलेले आणि ज्यांची ईडी चौकशी व्हावी अशा नोटीस निघालेल्या नेत्यांची यादी आम्ही देणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. भाजपात गेलेल्यांनी मनीलाँड्रीग केलेले आहेत, मात्र अशांना इनकमटॅक्स, ईडी, सीबीआय चे सरंक्षण असल्याचा आरोप करत पाटील यांनी आम्ही चौकश्याना घाबरत नसल्याचे सांगितले.

Updated : 29 Sep 2021 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top