Home > Politics > भाजपला मतदारांनी नाकारले, देगलुर-बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

भाजपला मतदारांनी नाकारले, देगलुर-बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

भाजपला मतदारांनी नाकारले, देगलुर-बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
X

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारत काँग्रेसला साथ दिली आहे. इथे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळवला आहे. नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यासह इतर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41हजार 933 मतांनी विजयी झाले आहेत. अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष पिराजीराव साबणे यांचा पराभव केला आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. पण प्रत्यक्षात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रामुख्याने ही लढत होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.

त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपकडून अनेक मोठ्या नेत्यांनी देगलूरमध्ये जाऊन प्रचार केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभासुद्धा झाल्या होत्या. पण मतदारांनी भाजपाला नाकारत काँग्रेसला मतांचे दान दिले आहे.

Updated : 2 Nov 2021 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top