Home > Politics > जिल्हा बँक निवडणूक, जळगावात काँग्रेसची स्वबळाची घोषणा

जिल्हा बँक निवडणूक, जळगावात काँग्रेसची स्वबळाची घोषणा

जिल्हा बँक निवडणूक, जळगावात काँग्रेसची स्वबळाची घोषणा
X

राज्यातील १२ जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यातील सत्तेत एकत्र असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र लढणार का अशी चर्चा असताना आता काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे.

जळगाव जिल्हा बँकेत काँग्रेसला विजय मिळण्यासाठी पोषक वातावरण असल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली आहे. तर गेल्यावेळी गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन एकच पॅनल तयार केले होते. तसाच प्रयत्न यावेळी आपण करणार असल्याचे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

Updated : 26 Aug 2021 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top