Home > Politics > काँग्रेसची स्वबळाची घोषणा, महाराष्ट्रासाठी राहुल गांधींचा 'मास्टर प्लान'

काँग्रेसची स्वबळाची घोषणा, महाराष्ट्रासाठी राहुल गांधींचा 'मास्टर प्लान'

काँग्रेसची स्वबळाची घोषणा, महाराष्ट्रासाठी राहुल गांधींचा मास्टर प्लान
X

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. यावेळी कर्नाटकचे काँग्रेसचे एपच.के.पाटील यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतीली. पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात आणि रणनीती संदर्भात या भेटीत चर्चा झाली.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. पटोले यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन टॅपिंगचे केल्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर शरद पवार यांनी काँग्रेसच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांकडे तक्रारही केली होती. स्वबळावर लढायचे असेल तर तशी घोषणा करा म्हणजे आम्हालाही मग तयारीला लागता येईल, या शब्दात शरद पवारांनी खडसावले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची सारवासारव केली होती. पण आता पुन्हा एकदा पटोले यांनी स्वबळाची घोषणा केली होती.

महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांचा 'मास्टर प्लान'

राहुल गांधी यांच्या भेटीविषयी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, "महाराष्ट्तील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष कऱण्याचे माझे स्वप्न आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे, त्यानुसार काम केले जाणार आहे. काँग्रेसला सक्षण करण्यासाठी आम्ही सर्वकाही करु" असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढणार आहे, याविषयी विचारले असता, निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत, त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे उत्तर नाना पटोले यांनी दिले.

Updated : 21 July 2021 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top