काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाईच्या पूरपरिस्थितीची केली पाहणी
X
अतिवृष्टीमुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये प्रचंड नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वाईला भेट दिली. पुणे येथील नियोजित दौरा अर्धवट सोडून नाना पटोले वाईमध्ये दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या सुचना दिल्या. सोबतच नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.
अतिवृष्टीमुळे जांभळी, कोंढावळे येथील देवरुखवाडी येथे शेतीचे तसेच राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत माहिती देत बापू शिंदे यांनी पटोले यांचेकडे जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली. सोबतच देवरुखवाडीचे पुनर्वसन करा तसेच दरवर्षी रस्त्यांवरील पुल वाहून जात असल्याने या प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती पटोले यांच्याकडे केली.
दरम्यान नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. सोबतच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील पश्चिम भागाचा लवकरच दौरा करतील असं पटोले यांनी म्हटले आहे.






