Home > Politics > हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा थांबवून दाखवा, अतुल लोंढे यांचे राहुल शेवाळे यांना आव्हान

हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा थांबवून दाखवा, अतुल लोंढे यांचे राहुल शेवाळे यांना आव्हान

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सावकरांवर टीका केली होती. त्यावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे.

हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा थांबवून दाखवा, अतुल लोंढे यांचे राहुल शेवाळे यांना आव्हान
X


बिरसा मुंडा (Birasa Munda) इंग्रजाशी लढले. दुसरीकडे सावरकर ब्रिटीशांना पत्र लिहीत होते, असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) केले. त्यावरून ही यात्रा बंद करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi Shivsena) पक्षाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul shewale) यांनी केली. त्याला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul londhe) यांनी प्रत्युत्तर दिले.

अतुल लोंढे राहुल शेवाळे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, राहुल शेवाळे यांनी कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे, असं मला वाटत नाही. तसेच ज्यांनी त्यांना मोठं केलं. त्यांना सोडून गेले आहेत. आता ते काँग्रेसला शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सावरकरांविषयी त्यांनी व्यवस्थित वाचून घ्यावं. सावरकरांनी माफी मागितली हा गनिमी कावा, असल्याचे शेवाळे म्हणाले. मग सावरकरांनी मागितलेली माफी इंग्रजांना मदत करण्यासाठीचा गनिमी कावा होता का? असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना लोंढे म्हणाले की, सावकरांनी (VD savarkar) केलेला गनिमी कावा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कमजोर करण्यासाठी होता का? एवढंच नाही तर हिंदू महासभेने (Hindu mahasabha) काँग्रेस विरोधात मुस्लीम लीगसोबत (Muslim league) सरकार स्थापन केले होते. 1942 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी (Shyamaprasad Mukharjee) यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारत काँग्रेसी गुंडांना सरळ करणार असल्याचे म्हटले होते, असा दावा अतुल लोंढे यांनी केला.

सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेविरोधात लढण्यासाठी सावरकरांनी लोकांना ब्रिटीश आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते, असंही अतुल लोंढे म्हणाले. त्याबरोबरच राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रेवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देतांना हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा थांबवून दाखवा, असं आव्हान अतुल लोंढे यांनी दिले.


Updated : 17 Nov 2022 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top