- धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकांनी जेवणखाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली उध्दव ठाकरे यांची विनंती
- MIM रस्त्यावर, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध
- नुपूर शर्मा यांना दणका, देशाची माफी मागा - सुप्रीम कोर्ट
- आता पुन्हा विधीमंडळाचे विशेष आधिवेशन: विधानसभा अध्यक्ष ठरणार
- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत

शिवसेनेची बंडखोरांना ऑफर, काँग्रेसला काय वाटते?
X
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यात तयार आहे, असा संदेश संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना दिला आहे. पण बंडखोर आमदारांनी २४ तासात महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी केली तर त्यांच्या मागणीवर विचार होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
पण त्यांच्या या घोषणेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही तिन्ही पक्ष सोबत राहू आणि महाविकास आघाडीला मजबूत करू, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आमचे संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे
महाविकास आघाडी सरकारची निर्मिती महाराष्ट्राच्या विकासासाठी झाली आहे, पण महाराष्ट्रात गडबड होत आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठीच शिवसेना आमदारांना भाजपने सुरतला नेलं असा आरोप त्यांनी केला. तसेच "महाविकास आघाडी सरकार एक मजबूत सरकार आहे. भाजप या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, हा भाजपचाच खेळ आहे, असा आरोपही त्यांनी केला. "भाजप विरोधी सरकार राहू नये यासाठी हे प्रयत्न आहे. राष्ट्रपती निवडणुकी दरम्यान महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे." असाही आरोप त्यांनी केला.