Home > Politics > मल्लिकार्जुन खर्गेंचा तोल ढळला...

मल्लिकार्जुन खर्गेंचा तोल ढळला...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले आहे. खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. खर्गे यांचा मोदी यांच्यावर टिका करताना तोल ढासळला आहे. खर्गे नेमके काय म्हणाले आहे ते वाचा...

मल्लिकार्जुन खर्गेंचा तोल ढळला...
X

काँग्रेस अध्यक्ष ( CONGRESS PRESIDENT ) मल्लिकार्जुन खर्गे ( MALLIKARJUN KHAEGE ) यांनी केंद्रातील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PRIME MINISTER NARENDRA MODI ) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. केंद्र सरकार हे लोकशाहीच्या विरोधी असल्याचा आरोप खर्गे यांनी यावेळी केला. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने सरकारच्या विरोधात आणि त्यांच्या हुकूनशाहीविरोधात एकजुटीने लढले पाहिजे. असे खर्गे म्हणाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PRIME MINISTER NARENDRA MODI ) यांच्यावर टिका करताना मल्लिकार्जुन खर्गे ( MALLIKARJUN KHAEGE ) यांचा तोल ढासळल्याचे पाहायला मिळाले. खर्गे यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली.

छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या ( CONGRESS ) ८५ व्या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात खर्गे यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना मोदीबाबत प्रक्षोभक भाषेचा वापर केला. "तुझ्यासारखे खूपजण आले आणि निघून गेले, तुझ्या ५६ इंच छातीचे काय करायचे, लोकांना अन्न आणि रोजगार दे, जर ही छाती एका इंचाने जरी कमी झाली तरी अडचण नाही. दुबळा असल्याने कुणी मरत नाही." अशा भाषेचा वापर खर्गे यांनी यावेळी केला.

केंद्रात सत्तेवर असलेले सरकार हे लोकशाहीवादी नाही. हे सरकार जनतेसाठी काम करत नाही. हे सरकार केवळ आपली हुकूमशाही चालवत आहे. "आम्हाला संसदेत गरीब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसंबंधीचे विषय मांडण्याचे स्वातंत्र मिळत नाही. माझं भाषण आणि राहुल गांधींचं भाषण हटवण्यात आलं. आम्ही कुठल्याही अपमानजनक शब्दांचा वापर केला नव्हता. आम्ही केवळ अदानींबाबत प्रश्न विचारले होते." असे खर्गे यांवेळी म्हणाले.

अदानी यांची संपत्ती २००४ च्या अगोदर ३ हजार कोटी रुपये होती. ती २०१४ मध्ये ५० हजार कोटी झाली. २०२१ ते २०२३ च्या दरम्यान त्यामध्ये १३ पटीने वाढ झाली. ही कोणती जादू आहे. अदानीला असा कोणता मंत्र तुम्ही दिला आहे. ज्यामुळे अदानी यांच्या संपत्तीमध्ये इतक्या पटीने वाढ होत आहे. तो मंत्र आम्हाला सुद्धा सांगा, असे खर्गे यावेळी म्हणाले. एका रुपयाचे अडीच वर्षात १३ रुपये कसे होतात. याचं काय गणित आहे. हे गणित देशातील जनतेला समजले पाहिजे. तसेच १ लाख रुपयांचे १३ लाख रुपये होतात, हे पण मोदी यांनी स्पष्ट करावे. असा सवाल खर्गे यांनी यावेळी उपस्थित केला.

आज आपण अशा लोकशाहीमध्ये आहोत, जिथे बोलण्याचे, लिहिण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिलेले नाही. आज कुणी खरं बोललं तर त्याला तुरुंगात पाठवलं जातं. अधिवेशन सुरु असताना धडाधड धाडी टाकल्या जातात. तुम्ही कुणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात. छत्तीसगडमधील जनता याला घाबरणार नाही, असे खर्गे यांनी अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले.

Updated : 27 Feb 2023 9:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top