Home > Politics > हिटलरच्या वाटेवर चाललात तर त्यांचाही मृत्यू हिटलरसारखाच, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हिटलरच्या वाटेवर चाललात तर त्यांचाही मृत्यू हिटलरसारखाच, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ED कडून चौकशी सुरू आहे. त्यातच मोदी सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस नेत्याने मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

हिटलरच्या वाटेवर चाललात तर त्यांचाही मृत्यू हिटलरसारखाच, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
X

नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी यांची ED कडून चौकशी सुरू आहे. दरम्यान मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर राहुल गांधी यांच्या ED कडून सुरू असलेल्या चौकशीविरोधात काँग्रेसकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते सुबोध कांत सहाय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सुबोध कांत सहाय जंतर मंतर येथे बोलत असताना म्हणाले की, गेल्या दहा दिवसांपासून आपण संघर्ष करत आहोत. एवढंच नाही तर गेल्या 135 वर्षांचा इतिहास देशाच्या पंतप्रधान मोदी यांना माहित नाही. पण काँग्रेस कोणती परंपरा पाळतो हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहित आहे. याबरोबरच राहुल गांधी यांच्या अंगात दम असून ते डोळ्यात डोळे घालून जर कोणी बोलू शकतात, असं मत सहाय यांनी व्यक्त केले.

सुबोध कांत सहाय पुढे म्हणाले की, मोदी हे हिटलरच्या मार्गाने चालत आहेत. त्यामुळे हिटलरच्या वाटेवर चालणारांचा मृत्यू हिटलरसारखाच होतो, असं वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र सुबोध कांत सहाय यांच्या वक्तव्यानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर सुबोध कांत सहाय यांनी केलेल्या वक्तव्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Updated : 20 Jun 2022 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top