Home > Politics > काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची नोटबंदीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची नोटबंदीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची नोटबंदीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका
X

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झालेत. या निर्णयाने लोकांचा किती फयादा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पहिल्यांदा देशाचे पंतप्रधानांनी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर मोदींनी निर्णय बदला, नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयाने आपण कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो अशी टीका त्यांनी केली.

चिदंबरम पुढे बोलताना म्हणाले की, देशातील काळा पैसा वापस मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. नोटबंदीनंतर कोणत्याही प्रकारे काळा पैसा बाहेर आला नाही. एवढेच नाही तर, नोटबंदी झाली तेव्हा देशभरात 18 लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या 28.5 लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते. असं चिदंबरम म्हणाले.

केंद्राकडून नुकताच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डीझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले. मात्र , यावरून देखील चिंदबरम यांनी केंद्रावर टीका केली. 2020-21 मध्ये केंद्राला उत्पादन शुल्कामधून 3,72,000 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर आता उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Updated : 13 Nov 2021 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top