Home > Politics > मुंबई महापालिकेच्या हद्दवाढीवर काँग्रेसचा आक्षेप

मुंबई महापालिकेच्या हद्दवाढीवर काँग्रेसचा आक्षेप

मुंबई महापालिकेच्या हद्दवाढीवर काँग्रेसचा आक्षेप
X

राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी समोर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केल्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या मुंबई महापालिकेतील हद्दवाढीवर काँग्रेसनेच आक्षेप नोंदवला आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर तीन्ही पक्षातील कुरबुरी समोर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेतील हद्दवाढीवर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्षेप नोंदवला आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबई महापालिकेची निवडणूक पक्षीय भेदभाव न करता लोकशाही प्रक्रीयेचा अवलंब करून कराव्यात. त्यामध्ये आरक्षण आणि हद्दवाढीची प्रक्रीया नव्याने करण्यात यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणूकीसाठी शिवसेनेने भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या हद्दवाढीवरूनही काँग्रेसने आक्षेप नोंदवल्याने महाविकास आघाडीतील खदखद बाहेर आली आहे.

Updated : 14 July 2022 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top