Home > Politics > काँग्रेसला मायबाप राहिला नाही, नारायण राणे यांची काँग्रेसवर टीका

काँग्रेसला मायबाप राहिला नाही, नारायण राणे यांची काँग्रेसवर टीका

काँग्रेसला मायबाप राहिला नाही, नारायण राणे यांची काँग्रेसवर टीका
X

एकीकडे देशात काँग्रेसची जोडो भारत यात्रा सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर शशी थरूर यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्यातच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धामधूम सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर हे वर्धा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे.

शशी थरूर यांनी बोलताना म्हटले होते की, 2024 नंतर देशात काँग्रेस सत्तेत येईल, असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले की, थरुर म्हणजे थरथरत आहेत का ते. आताच कुठं दिसतीय काँग्रेस. तुमचा अध्यक्ष तरी कोण आहे. कोण सांभाळणार आहे? काँग्रेसला मायबाप शिल्लक नसल्याची टीका नारायण राणे यांनी काँग्रेसवर केली. तसेच औषधासाठी देशातील राष्ट्रवादी, समाजवादी असे छोटे पक्ष राहतील, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच यापुढे देशात फक्त एकच पक्ष राहील आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष असंही नारायण राणे म्हणाले.

शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे.

यावेळी नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच शिवसेनेचा अस्त जवळ आला असल्याचे नारायण राणे म्हणाले. जर बाळासाहेब असते तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनले नसते. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना नाही तर मला मुख्यमंत्री केलं होतं, असंही नारायण राणे म्हणाले. तसेच पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचा माणूस नाही. उध्दव ठाकरे यांनी मोदींचा फोटो वापरून निवडणूक जिंकली आणि मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाऊन हिंदूत्वाशी गद्दारी केली.

Updated : 3 Oct 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top