Home > Politics > किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करा: कॉंग्रेसच्या अतुल लोंढेची मागणी

किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करा: कॉंग्रेसच्या अतुल लोंढेची मागणी

किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करा: कॉंग्रेसच्या अतुल लोंढेची मागणी
X

खोटे आरोप करुन कॉंग्रेस पक्षाची बदनामी केल्यामुळे भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली आहे. गेले काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपानं गाजत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या आरोप करण्यास सुप्रसिध्द आहेत.

एका वृत्तवाहीनीच्या लाईव कार्यक्रमात भाजप नेते किरीट सौमय्या आणि कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची चांगलीच जुंपली होती. वृत्तवाहीनीवर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांतील ४० कोटी रुपये राष्ट्रवादीला, ४० कोटी रुपये शिवसेनेला आणि २० कोटी रुपये कॉंग्रेसला मिळाले असल्याचे सांगितले.

त्यावर अतुल लोंढेंनी किरीट सोमय्यांना याचे पुरावे द्या, अन्यथा आरोप मागे घ्या. नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा असं सांगितलं. त्यावर किरीट सोमय्यांनी चर्चेतून पळ काढत फोन बंद केला.सोमय्यांचे आरोप नेहमीच कपोकल्पित, धादांत खोटे आणि पुरावा नसलेले असतात. वारंवार खोटे आरोप करुन त्यांनी कॉंग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. हे कृत्य भारतीय दंडविधान संहितेनुसार गुन्हा असून त्यांच्यावर भादंवि कलम ३७. ४९९,५०३,५०४,५०५, आणि २११ गुन्हा दाखल करुन कठोर कारवाईची मागणी अतुल लोंढे यांनी नागपूर (शहर) पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Updated : 2021-11-03T15:36:04+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top