Home > Politics > क्रांती रेडकरच्या बहिणीची पोलिसात धाव, मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार

क्रांती रेडकरच्या बहिणीची पोलिसात धाव, मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार

क्रांती रेडकरच्या बहिणीची पोलिसात धाव, मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार
X

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणी तसेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप करत , हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र , आता क्रांती रेडकर यांच्या बहिणीच्या वकिलाने गोरेगाव पोलीसात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे.

नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या बहिणीचे नाव घेऊन एका प्रकरणाबाबत ट्विट केले होते. या ट्विटमध्ये हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? असा सवाल मलिक यांनी केला होता. या ट्विटनंतर आता हर्षदा रेडकर यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी काल (9 ऑक्टोबर) दुपारी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. कलम 354, 354 डी, 503 आणि 506 कायद्यांतर्गत FIR नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक समीर वानखेडे, वानखेडे यांचे वडील यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. त्यांनी वानखेडे यांचे चुकीचे कागपदत्रे सादर करुन मागासवर्गीयांची नोकरी बळकावल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता मलिक यांनी समीर यांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटसोबत त्यांनी काही स्क्रीनशॉटसुद्धा प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Updated : 10 Nov 2021 3:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top