Home > Politics > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नारायण राणेंना सणसणीत उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नारायण राणेंना सणसणीत उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नारायण राणेंना सणसणीत उत्तर
X


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अपक्षेप्रमाणे राजकीय टोलेबाजीने गाजला. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्य़ासपीठावर आल्याने या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उद्घाटनानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर टीका केली तसेच शिवसेनेच्या कोकणातील नेत्यांवरही जोरदार टीका केली, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय आपलेच आहे, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला. यानंतर मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या टीकेला काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिले.

महाराष्ट्राच्या मातीत आंबे उगवतात तशी बाभळीही उगवते, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. नारायण राणे यांच्या विकासकामांचे श्रेय घेण्य़ाच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांनी चिमटे काढत उत्तर दिले. सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे हे वास्तव आहे, पण कुणी म्हणेल तो आपणच बांधला, कृपया तसे करु नका, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळ नारायण राणे यांना लगावला. आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असे चिमटेही मुख्यमंत्र्यांनी काढले. एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीमध्ये भाषण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. "इतकं लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार ते विसरले नाहीत, मातीमध्ये एक संस्कार असतो, मातीच्या वेदना मातीलाच कळतात, मातीत अनेक झाडं उगवतात त्यातील बाभळीचे असतात तर काही आंब्याचे असतात, बाभळीचे झाडं उगवले तरी मातीला ते जोपासावे लागते," असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं आणि मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

कोकणाने शिवसेनेला कायम साथ दिली आहे म्हणूनच शिवसेनेचा खासदार विनायक राऊत यांच्या रुपाने जनेतेने निवडून दिला आहे, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी थेट नारायण राणे यांचे नाव घेऊन केला. तसेच कोकणात शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढून टाकले होते, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.

Updated : 9 Oct 2021 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top