Home > Politics > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात 'बंद दाराआड' चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात 'बंद दाराआड' चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची शुक्रवारी बंद दाराआड चर्चा झाली आहे. या बंद दाराआडची चर्चा आणि त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. प्रवीण दरेकर यांनी राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने दीड कोटीच्या मदतीचा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आणि इतर लोक उपस्थित होते, " पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे राहिलो असून मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीकरिता दीड कोटींचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला."

तसेच म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतींकडून थकीत सेवाशुल्क आणि नवीन वाढीव बिलांच्या वसुलीचा म्हाडाचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना निवेदन सादर केले आहे." अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे.

दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर या सार्वजनिक भेटीनंतर दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नंतर बंद दाराआडही चर्चा झाली. जवळपास अर्धा तास या दोघांची चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्या 'बंद दाराआड' चर्चाअशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दरेकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोघांची काही वेळ स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीनंतरसुद्धा अशीच राजकीय चर्चा रंगली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री दरेकरांसोबतच्या बंद दाराआडच्या चर्चेबद्दल काही बोलतात का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 2021-08-14T09:33:45+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top