News Update
Home > Politics > अखेर मुख्यमंत्री मौन सोडणार

अखेर मुख्यमंत्री मौन सोडणार

अखेर मुख्यमंत्री मौन सोडणार
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार संकटात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घडामोडींनंतर गेल्या दोन दिवसात जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच त्यांना कोरोना झाल्यामुळे इतर नेतेही त्यांना भेटू शकत नाहीयेत. सरकार पडणार असल्याची चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिवसैनिकांनाही कोणताच संदेश दिलेला नसल्याने सगळेच संभ्रमात आहेत.

या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे तशी माहिती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. यावेळी त्यांनीपक्षातील बंडाळीबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

५ वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यासाठी प्रतोद सुनिल प्रभू यांनी बंडखोर आमदारांना तशी नोटीसही पाठवली होती. पण एकनाथ शिंदे यांनी आपण गटनेते असल्याने सुनिल प्रभू यांना असे आदेश काढण्याचा अधिकार नसल्याचे सांगत "शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. असे म्हटले आहे.अखेर मुख्यमंत्री मौन सोडणार, जनतेशी साधणार संवादअखेर मुख्यमंत्री मौन सोडणार, जनतेशी साधणार संवाद

Updated : 2022-06-22T16:54:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top