Home > Politics > उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचं ट्वीट

उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचं ट्वीट

सर्वोच्च न्यायालायच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. तर त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचं ट्वीट
X

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झाले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ठाकरे बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. तर संजय राऊत यांनी ट्वीट करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली आहे.

न्याय देवता का सन्मान होगा! फायर टेस्ट fire test अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जायंगे.. जय महाराष्ट्र! ,असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लोकशाहीचा न्यायपालिका हा स्तंभ कोसळून पडल्याचा फोटो संजय राऊत यांनी टाकला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत न्यायालयाच्या निकालावर टिपण्णी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपला राजीनामा जाहीर केला. यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी आपल्या मनोगतात काय सांगितले ते पाहा..

"मी आश्वस्त केले होतं जे सुरु केलंय ते सुरु राहील. आतापर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने...सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन.

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्याय देवतेने निकाल दिलाय. फ्लोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार, असं उध्दव ठाकरे म्हणाले.

Updated : 29 Jun 2022 4:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top