Home > Politics > उध्दव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

उध्दव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

उध्दव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
X

महाविकास आघाडीवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर गंभीर आऱोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या पार्टनरचे संबंध थेट 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबच्या सुत्रधारांपर्यंत असल्याचा गंभीर आरोप पुण्यात पत्रकार परिषदेतून केला.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटले की, शरद पवार यांचे संबंध नवाब मलिक यांच्यामार्फत असू शकतात तर उध्दव ठाकरे यांचे त्यांच्या पार्टनरमार्फत थेट कसाबशी संबंध होते, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना देण्यात आलेले बुलेटप्रुफ जॅकेट हे हलक्या दर्जाचे होते. त्यामुळेच दहशतवाद्यांइतकेच शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूला बुलेटप्रुफ जॅकेट बनवणाऱ्या कंपनीचे बिमलकुमार अग्रवाल हे देखील दोषी असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

बिमलकुमार अग्रवाल हे तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती. तर सध्या ते जामीनावर आहेत. मात्र या बिमल अग्रवाल यांची यशवंत जाधव यांचे पुत्र यतीन अग्रवाल यांच्या समर्थ इरेक्टर डेव्हलपर्स या कंपनीत भागीदारीचे व्यावसायिक संबंध आहेत. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना हलक्या दर्जाचे बुलेटप्रुफ जॅकेट प्रकरणातील आरोपी बिमल अग्रवाल यांच्याकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी टीडीआर घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध बिमल अग्रवाल ते कसाब आणि कसाब ते दाऊदपर्यंत पोहचत असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

Updated : 24 May 2022 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top