Home > Politics > मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दांपत्याविरोधात अमरावतीमधून लढणार – मंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दांपत्याविरोधात अमरावतीमधून लढणार – मंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दांपत्याविरोधात अमरावतीमधून लढणार – मंत्री अब्दुल सत्तार
X

राणा दांपत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट राणा दांपत्याला आव्हान दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्या प्रकरणावरून राणा दांपत्याला 12 दिवस कोठडीची हवा खावी लागली. मात्र जामीन मिळाल्यानंतर राणा दांपत्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे राणा दांपत्याच्या टीकेवरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी राणा दांपत्याला आव्हान दिले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, भाजप नेते नारायण राणे हे चार आणे सारखी गोष्ट करीत आहेत. तर चार आणेवाला मोठ्या डोंगराला आव्हान देत आहेत. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ज्या घोषणा केल्या किंवा ते जे काही बोलले ते त्यांनी केले. त्यामुळे देशात त्यांचे नाव आहे. ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. पण काही लोकांना फक्त बोलायला माईक पाहिजे. त्यामुळे ते अशा विषयांवर बोलतात. पण मला जर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी अमरावती येथून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

राणा दांपत्याला भाजपची सुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात राणा दांपत्याने टीका केल्यामुळे राणा दांपत्य हे भाजपची सुपारी घेऊन बोलत आहेत. तसेच राणा दांपत्य माझ्याविरोधात निवडणूक लढवणार नाहीत. कारण ते जाती धर्माच्या नावावर राजकारण करतात. तर ते कधी आरक्षणाची गोष्ट करतात. तर कधी मागासवर्गीयांवरच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करतात. त्यामुळे राणा दांपत्याला भाजपची सुपारी असल्याचा आरोप महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.

Updated : 9 May 2022 7:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top