Home > Politics > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; अमित शाह यांच्या सोबत महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; अमित शाह यांच्या सोबत महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; अमित शाह यांच्या सोबत महत्त्वाची बैठक
X

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित गेल्या सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीवेळी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जशी स्वतंत्र बैठक झाली होती तशीच स्वतंत्र बैठक गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्षलवादी भागात रखडलेल्या विकासकामांचाही मागील बैठकीत आढावा घेण्यात आला. नक्षलवादी कारवाया या ग्रामीण भागातून शहरी भागात वाढत असल्यानं केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज दिल्लीत ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांच्यासोबत सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची चर्चा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Updated : 26 Sep 2021 2:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top